पिंपरी चिंचवड : अभिसार फाउंडेशनच्या ऊर्जा दिव्यांग मुलांची शाळा (ओटीझम) वाकड येथे मुलांनी आषाढी वारी निमित्ताने संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा साजरा केला. या वेळी पालखीची मिरवणूक काढली. भजन म्हटली. महिला शिषकांनी व पालकांनी फुगड्या खेळल्या.
यावेळी शोमित्र बर्वे यांनी तबला, ओंकार तरडे यांनी झाबे, यश मोहिते यांनी टाळ वाजवले. शाहील देशपांडे पसायदान म्हंटले. त्यानंतर विठलाची आरती झाली. या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली खेडेकर, स्मिता हांडे, भाग्यश्री कापसे, शुभांगी जाधव, विकास जगताप, ऋषीकेश मुसूडगे यांनी केले. यावेळी अभिसार फाउंडेशनच्या अध्यक्ष मिनिता पाटील, खजिनदार कल्पना मोहिते उपस्थित होत्या.
– क्रांतिकुमार कडुलकर