Monday, May 13, 2024
HomeNewsजुन्नर : वडिलांच्या स्मरणार्थ श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जुन्नर : वडिलांच्या स्मरणार्थ श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जुन्नर / पौर्णिमा बुचके : श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे शाळेचे माजी विद्यार्थी वैभव मच्छिंद्र चव्हाण यांनी त्यांच्या वडिल कै.मच्छिंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या  स्मरणार्थ श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आज वह्या वाटप केले. यापुढे देखील विद्यालयासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन याप्रसंगी वैभव मच्छिंद्र चव्हाण यांनी दिले. ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे असे मुख्याध्यापक याकूब शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय अरकडे यांनी केले तर ते कैलास दाभाडे यांनी आभार मानले.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक याकूब शेख, जेष्ठ शिक्षक दत्तात्रय अरकडे, तारा डुंबरे, मंगल तांबे मॅडम, ज्ञानदेव पवार, धनंजय राजुरकर, कैलास दाभाडे, किशोर पगार, सविता दातिर, ज्योती पुंडे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय