Tuesday, May 21, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : अमृता कडुलकरची उच्च शिक्षणासाठी जर्मनीतील विद्यापीठात निवड, HDFC बँकेचे...

पिंपरी चिंचवड : अमृता कडुलकरची उच्च शिक्षणासाठी जर्मनीतील विद्यापीठात निवड, HDFC बँकेचे अर्थसहाय्य

पिंपरी चिंचवड : चिंचवडच्या प्रतिभा कॉमर्स अँड कॉम्पुटर विद्यालयाची विद्यार्थिनी अमृता कडुलकर ला जर्मन सरकारच्या हॉफ युनिव्हर्सिटीने ग्लोबल कार्पोरेट मॅनेजमेंटच्या उच्च पदवीसाठी निवड केली आहे. तिने प्रतिभा कॉलेजमधून इंटरनॅशनल बिझिनेस ची पदवी प्राप्त केली. HDFC बँकेने तिच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय जाहीर केले आहे.

अमृता कडुलकर म्हणाली की, भारतातून दरवर्षी मास्टर डिग्रीसाठी भारतातील गुणवंत विद्यार्थ्यांची जर्मन विद्यापीठे निवड करतात. इंग्रजी, जर्मन, हिंदी सह मातृभाषा कन्नड, मराठी मला येते. माझी निवड मेरिटवर झालेली आहे. 

जागतिक व्यवसाय व्यवस्थापन (ग्लोबल मॅनेजमेंट) हा अलीकडच्या काळातील हा दोन वर्षांचा मल्टीलेव्हल अभ्यासक्रम आहे. प्रतिभा कॉलेजचे डॉ. दीपक शहा, प्रा.राजेंद्र कांकरिया यांनी तिला मार्गदर्शन केले. दहावी पर्यंतचे शिक्षण टाटा मोटर्स पिंपरीच्या विद्यानिकेतन शाळेमध्ये झाले.

HDFC CREDILA पुणे सेल्स मॅनेजर अमोल झिरपे यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही फक्त विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यानाच युरोप, इंग्लंड, अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्थसहाय्य देतो. आमचे इंटरनॅशनल नेटवर्क मुलांना कोणत्याही प्रकारची आर्थिक चणचण भासू देत नाही.

HDFC CREDILA पुणेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले की, सध्याच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही पालकांच्या चिंतेची बाब आहे. कितीतरी पालक त्यांच्या मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मालकीची शेती आणि घरे विकतात. कारण त्यांना माहीत नसते की, मुलांची बुद्धिमत्ता, परदेशी भाषा प्राविण्य हेच त्यांचे भांडवल असते. आम्ही पालकांच्या घरी येऊन पूर्ण माहिती देतो. मुलामुलींचे प्राविण्य हाच निकष लावून होतकरू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गरजाची शिक्षण पूर्ण होईपर्यंत काळजी घेते. आम्ही अमृता कडुलकरला 15 लाखाचे अर्थसहाय्य दिले आहे. आमचे इंटरनॅशनल डेबिट कार्ड आम्ही मुलांना देतो. विमान प्रवास, विद्यापीठातील शैक्षणिक खर्च, परदेशातील अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य विमा, अंतर्गत प्रवास इ. सर्व खर्च आम्ही विद्यार्थ्यांना देतो. त्यामुळे विशेष प्राविण्य मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणाची स्वप्ने पूर्ण होतात. महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो मुले आज परदेशात आधुनिक शिक्षण घेऊन युरोप अमेरिकेतील मोठ्या पदावर काम करत आहेत.

 

अमृताचे वडील वडील क्रांतिकुमार कडुलकर यांनी सांगितले की, शैक्षणिक कर्ज मिळवणे हा पालकांसाठी मोठा मनस्ताप असतो. सरकारी बँकांकडून अर्थसहाय्य लगेच मंजूर होईल याची खात्री नसते. मात्र एका मोबाईल कॉलमुळे फक्त सात दिवसात HDFC CREDILA ने अर्थसहाय्य दिले. मी त्याच्या टीमचा आभारी आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू मुलांना भारतात आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी आम्ही मदत केंद्र सुरू केले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी खालील नंबरवर संपर्क करावा. 7972787015, 7030653349.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय