नाशिक प्रतिनिधी: ननाशी परिसरात शुक्रवारी सकाळी च्या वेळेला एका आवाजाने जमिनीला हादरे बसले.या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.दरम्यान, नाशिक येथील भूकंपमापक यंत्रणांवर याबाबत नोंद झाल्याचे नोंद झाल्याचे दिंडोरीचे प्रांत अधिकारी डॉ. संदीप अहिरे यांनी दिली.
दिंडोरी -पेठ तालुक्याच्या सीमेवरील ननाशी जोगमोडी परिसरात शुक्रवारी अकरा वाजेच्या दरम्यान काही मिनिटांसाठी मोटा आवाज झाला. या बरोबरच जमिनीला हादरा बसला.या दरम्यान बरेसे लोक शेतीच्या कामात व्यस्त होते. अचानक झालेल्या प्रकारामुळे जनता भयभीत झाले.त्या वेळी आवाज कसला होता हे कुणालाच समजले नाही.
ननाशी परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो .त्यामुळे या परिसरात अधून मधून असे धक्के बसत असतात. याबाबदत सर्वे चालू आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये.मात्र कच्या घरात न राहता काळजी घ्यावी.
प्रशांत वाघमारे
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी