पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:’झाडे लावा, झाडे जगवा,’ या संदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरणा संदर्भात भरीव कार्य केल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांचा गौरव करण्यात आला. PCMC
माईर्स एमआयटी येथे आयोजित ग्रीन महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत वृक्षमित्र अरुण पवार यांना सन्मानित करण्यात आले. PCMC
यावेळी निवृत्त विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, निवृत्त सचिव किरण कुरुंदकर, एमआयटी’चे कार्यकारी संचालक राहुल कराड, उद्योजक शिवशंकर लातुरे, मिलिंद पाटील, उद्योजक प्रशांत इथापे, योगेश भोसले, नितीन असालकर, रोहित सरोज, संतोष शिंग, नितीन चिलवंत आदी उपस्थित होते.
परिषदेमध्ये अरुण पवार करत असलेल्या वृक्षारोपण,वृक्ष संगोपन या कार्याची दखल घेत कौतुक करण्यात आले. तसेच या कार्यामध्ये सहभाग नोंदवून वृक्ष संवर्धन करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, वृक्षमित्र अरुण पवार यांनी घोषणा केली, की दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस पडेपर्यंत झाडांना टँकरच्या माध्यमातून पाणी देऊन झाडांचे संगोपन करण्यात येणार आहे.
सध्या भंडारा डोंगर परिसर, इंदोरी परिसर सुदवडी रोड, केशेगाव, बावी, वाडी, बामणी, मोरडा, धारूर अशा सर्व ठिकाणी सात टँकरच्या माध्यमातून झाडांना नियमित पाणी देण्यात येत आहे. जानेवारीपासूनच या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही वृक्षारोपण केल्यानंतर पैकी जवळपास सर्वच झाडे आज डौलाने उभी आहेत असे अरुण पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा :
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून
मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा