Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : तर उद्योजक आत्मनिर्भर बनतील - राम भट

PCMC : तर उद्योजक आत्मनिर्भर बनतील – राम भट

प्रदर्शनास तीन हजार नागरीकांनी दिली भेट PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : औद्योगिक क्षेत्रातील नागरीकांना टुलींग तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. जेणेकरून परदेशातून टुलींग मशीन आयात (import) करण्याची वेळ येणार नाही. त्यातून उद्योजक आत्मनिर्भर बनतील. असा विश्वास टाटा मोटर्सचे (TATA MOTORS) सप्लाय चेन आणि गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक राम भट यांनी व्यक्त केला.

एनटीटीएफ ॲल्युमिनी असोसिएशन पुणे चॅप्टरच्या वतीने ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या टूलींग एक्स्पोच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी फोक्सवॅगन कंपनीचे उप महाव्यवस्थापक मनोज पाटील, हिताची अस्टेमोचे संचालक सुधीर गोगटे, ॲल्युमिनी असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक आर राजगोपालन, अध्यक्ष राजू सामनेकर, सचिव विनोद पट्टण , प्रदर्शनाचे समन्वयक केशव मानगे आदी मान्यवर उपस्थित होते. pcmc news

श्री मनोज पाटील म्हणाले कि, आज मेक इन इंडिया या संकल्पनेनुसार जास्तीत जास्त भारतात उत्पादन निर्मिती वाढली पाहिजेत. मात्र येत्या काही नजीकच्या काळात आयतीचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. म्हणजेच आपल्या देशात टुलींग निर्मितीचे प्रमाण वाढले आहे.

या प्रदर्शनात टूलिंग संदर्भातील वेगवेगळ्या प्रोफाईल असलेल्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने टूलिंग इंडस्ट्रीजला लागणारे सॉफ्टवेअर, प्रेस टूल, मोल्ड पार्ट,डाय कास्टिंग उत्पादक, कॉम्पोनंट, फिक्चर / गेज /एसपीएम उत्पादक, मशीन मॅन्युफॅक्चर आणि इन्स्पेक्शन इक्विपमेंट उत्पादक अशा ६० कंपन्यांचा सहभाग होता. या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणुन हस्को आणि एटीक्यू मेट्रो लाभले होते. pcmc news

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव मानगे तर सूत्रसंचालन नंदन प्रभू यांनी केले. तर आभार राजू सामनेकर यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय