Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : व्यक्तींचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा गौरव - गिरीश प्रभुणे

PCMC : व्यक्तींचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा गौरव – गिरीश प्रभुणे

ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट मनोज कदम, राजेंद्रसिंह वालिया यांना प्रदान PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आज आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात येत आहे. हा अभिमानाचा क्षण असून डॉक्टरेट मिळविलेल्या व्यक्तींबरोबरच समाजाचा आणि राष्ट्राचा ही गौरव आहे. गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांनी विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व्यक्तींचा गौरव करून समाजाला नवी दिशा दिली आहे; हे कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. pcmc news

गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहावा ग्लोबल गांधीयन फिलॉसॉफी मानद डॉक्टरेट प्रदान सोहळा निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात शनिवारी (२० एप्रिल) पार पडला.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मॅक्सवेल्स ग्रुपचे संचालक मनोज कदम यांनी मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाव्दारे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या याबद्दल तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ पत्रकार डॉ. महेंद्र देशपांडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. pcmc news

यावेळी गांधी पीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लाल बहादूर राणा, डॉ. सुनीलसिंह पुरणसिंह परदेशी, कर्तव्य फाऊंडेशनचे डॉ. विरेंद्र सिंह टिळे, डॉ. राजेंद्र आहेर, डॉ. महेंद्र देशपांडे, गांधी पीस फाऊंडेशनच्या आंतरराष्ट्रीय राजदूत डॉ. आशा पाटील, डॉ. श्वेता चौगुले आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. लाल बहादूर राणा, डॉ. महेंद्र देशपांडे, डॉ. आशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. सुनीलसिंह परदेशी यांनी केले. आभार डॉ. विरेंद्रसिंह टिळे यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय