Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : समाज विकास विभाग, दिव्यांग कक्ष ३१ पदांच्या मुलाखती स्थगित

PCMC : समाज विकास विभाग, दिव्यांग कक्ष ३१ पदांच्या मुलाखती स्थगित

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड (PCMC) महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्षाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशन या कंपनीसाठी मुलाखातीद्वारे (वॉक इन इंटरव्हू) पद्धतीने भरण्यात येणा-या विविध ३१ पदांच्या मुलाखती स्थगित करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड (PCMC) महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशन या कंपनीसाठी ३१ पदे मुलाखतीद्वारे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यानुसार दि.२६,२७ व २८ मार्च २०२४ रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील पत्रानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत निर्देश जाहिराती नुसार होणा-या विविध पदांसाठीच्या मुलाखती स्थगित करण्यात आले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध ३१ पदांच्या मुलाखतींसाठी पुढील तारीख व वेळ महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय