पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : वाकड येथील कस्तुरी चौकामध्ये उभारण्यात आलेल्या प्राजच्या पर्यावरण शिल्पाचे अनावरण आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते तसेच प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. PCMC
या अनावरण प्रसंगी मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, क्षेत्रीय अधिकारी अंकुश जाधव, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर आणि प्राज इंडस्ट्रीजचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. PCMC
नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल रोखण्याच्या उपायांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हिंजवडी येथील कस्तुरी चौकामध्ये पर्यावरण शिल्प उभारण्यात आले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम आणि त्यामुळे पर्यावरणाला निर्माण होत असलेला धोका याविषयी जागरूकता निर्माण करणे हे या पर्यावरण शिल्पाचे उद्दिष्ट आहे.
कस्तुरी चौकामधील हे पर्यावरण शिल्प हैदराबाद येथील स्नेहा आर्ट स्टुडिओच्या सहभागातून प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने उभारण्यात आले आहे. हे शिल्प तयार करण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला असून सुमारे २१ फूट उंची आणि १५ फूट रुंद अशा भव्य-दिव्य शिल्पामध्ये नक्षीदार कोरीवकामही करण्यात आले आहे. PCMC
या शिल्पाच्या तळाशी एक टोपी कोरण्यात आली आहे जी सुरक्षिततेचे महत्व दर्शवते. शिल्पाच्या केंद्रस्थानी डीएनए हेलिक्स दाखविण्यात आले आहे, जे समाज आणि शाश्वतता यांच्यातील वीण अधिकाधिक घट्ट करत नेण्याच्या अविरत प्रयत्नांचे द्योतक आहे.
तसेच शिल्पामध्ये कोरलेले इतर घटक उद्योजकता, नावीन्यता आणि ऊर्जा-सुरक्षितता दर्शवितात. पर्यावरण शिल्पाच्या खालच्या बाजूच्या सभोवताली असणारी ३ इंधन वितरण केंद्रे ही जैवभारापासून बनलेल्या पर्यावरणस्नेही जैवइंधनांची द्योतके आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!
मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे
मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !
IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!
ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस
मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल
मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?