Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : संजोग वाघेरे पाटील यांची "मॉर्निंग वॉक पे" मतदारांशी चर्चा

PCMC : संजोग वाघेरे पाटील यांची “मॉर्निंग वॉक पे” मतदारांशी चर्चा

मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्याचे आवाहन

ज्येष्ठ नागरिकांशी समस्यांवर मनमोकळेपणाने गप्पा

पिंपरी चिंचवड
: मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी आज, रविवारी सकाळी पिंपळे सौदागर लिनियर गार्डन येथे मॉर्निंग वॉक करत अभिनव पद्धतीने मतदारांशी संवाद साधला.यावेळी नागरिकांनी मोकळेपणाने वाघेरे पाटील यांच्यासोबत अनेक समस्यांवर‌ देखील चर्चा केली. pcmc news

संजोग वाघेरे पाटील यांनी रविवारी सकाळी लिनियर गार्डन येथे जॉगिंग पार्कला भेट दिली. यावेळी दररोज या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांसोबत संवाद साधला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, तसेच हास्य क्लब आणि योगा ग्रूपचे सदस्य आवर्जून उपस्थित होते. वाघेरे पाटलांनी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पिंपरी चिंचवड शहरातील लोकांच्या समस्यांवरही चर्चा केली.

मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval loksabha 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्ह लक्षात ठेवा. आपल्या समस्या सोडविण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत तुमचा आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्वांना केले. खासदार म्हणून देखील आपल्यासोबत वेळोवेळी संवाद साधण्यासाठी मी उपलब्ध असेल, असा विश्वास देखील वाघेरे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना दिला. pcmc news

प्रतिक्रिया

शहरात अनेक उद्यानांमध्ये नागरिक सकाळी, तसेच संध्याकाळी व्यायामासाठी येतात. त्यांच्यासाठी ओपन जीमचे साहित्य महापालिकेच्या माध्यमातून बसविण्यात येते. परंतु, जीमच्या साहित्याची संख्या कमी असल्यामुळे व साहित्याची दुरावस्था होते. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. यासह वाढणारी वाहतूक कोंडी, पादचारी मार्गाची गरज अशा अनेक बाबी उपस्थित नागरिकांनी माझ्यासमोर मांडल्या. देशातील स्थिती आणि राजकारणावर आपली मते व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांची काळजी किंवा त्यांना मिळणार्‍या सुविधा याकडे देखील आपण लक्ष देवू, याबाबत त्यांना आश्वस्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक सर्वांनीच बदल घडविण्याचा निश्चय केला आहे. हे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर दिसत असून येत्या ४ जून रोजी हेच आपल्याला पाहायला मिळेल.

संजोग वाघेरे पाटील, उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख

लोकप्रिय