Tuesday, June 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम

PCMC : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहाराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरात शुक्रवारी ( दि.१४) रोजी शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. pcmc

महाराष्ट्र विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदैव महाराष्ट्राच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे जननायक राज ठाकरे यांच्या जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्राभर मोठ्या उत्साहाने पार पाडला जात आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण शहरभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.

मनसे पिंपरी चिंचवड उपशहराध्यक्ष बाळा दानवले व चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे यांच्या वतीने संत मोनीबाबा अनाथ आश्रम बिजलीनगर चिंचवड या ठिकाणी
मिठाईवाटप, अन्नदान, फळ वाटप बिस्किट वाटप तसेच त्यांच्या हस्ते केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आले. pcmc news

जयसिंग भाट भोसरी विधानसभा संघटक यांच्यावतीने श्री दादा महाराज नाटेकर मोरया ट्रस्ट वृद्धाश्रम छात्रालय चिखली येथे लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला व मुलांना फळे व शालेय साहित्य बिस्कीटचे पुडे देण्यात आले. (MNS leader Raj Thakare birthday celebration)

यावेळी हेमंत डांगे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष महा. राज्य. बाळा दानवले – उपशहराध्यक्ष,रुपेश पटेकर, सचिव. मयूर चिंचवडे – चिंचवड विधानसभा अध्यक्ष, दत्ता देवतारासे – पिंपरी विधानसभा अध्यक्ष. सीमा बेलापूरकर – महिला सेना अध्यक्ष, अनिता पांचाळ – उपशहर अध्यक्ष महिला. वैशाली बोत्रे – विभाग अध्यक्ष चिंचवड विधानसभा

जयसिंग भाट-संघटक भोसरी विधानसभा, नाथा शिंदे – उपविभाग अध्यक्ष पिंपरी विधानसभा, नितीन चव्हाण, उपविभाग अध्यक्ष पिंपरी, हर्षल गावडे, मयूर गवळी, दीपक बडेकर, अक्षय पारखे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. pcmc

तसेच राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तीनही विधानसभा मिळून शहरात सत्कार कार्यक्रमाचे नियोजन केलेले असून.पूर्ण शहरात वृक्षारोपणाचाही कार्यक्रमाचे नियोजन आहे. Tree plantation

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय