Aadhar card update : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. 14 जून 2024 रोजी संपणारी ही मुदत आता 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ नागरिक आता 14 सप्टेंबरपर्यंत कोणतेही शुल्क न देता आपले आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख आणि लिंग यांसारखी माहिती मोफत अपडेट करू शकतात.
आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे नाव, लिंग, पत्ता, वय आणि बायोमेट्रिक माहिती इत्यादी माहिती असते. आधार कार्ड असेल तरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. तसेच प्रवास तिकीट बुकिंग आणि बँकेसंदर्भात काही कामे, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड महत्वपूर्ण ठरते.
माय आधार पोर्टलवरून करा Aadhar card update
UIDAI नुसार, नागरिक हे अपडेट https://uidai.gov.in/en/ या माय आधार पोर्टलवरून सहजपणे करू शकतात. यासाठी त्यांना त्यांचा आधार क्रमांक आणि आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. जर तुम्ही आधार सेवा केंद्रात आधार अपडेट करत असाल तर तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
10 वर्षांहून जुने आधार अपडेट करा
UIDAI ने नागरिकांना, विशेषतः 10 वर्षांहून जुने आधार कार्ड असलेल्यांना, त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. ही मुदत फक्त नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारख्या माहितीच्या अपडेटसाठी आहे. तुम्हाला तुमचा आधार कार्डचा पत्ता बदलायचा असल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागेल. तुम्ही तुमचा आधार क्रमांक बदलू शकत नाही.
अधिक माहितीसाठी
आधार कार्ड अपडेटशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही UIDAI च्या https://uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा :
मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त
ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI
यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
ब्रेकिंग : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५ खाद्यपदार्थांचा समावेश
मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, अर्ज दाखल
ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा
सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन
कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा