पिंपरी चिंचवड / क्रांती कुमार कडुलकर – पथ विक्रेता समिती निवडणूक निवडणूक २०२४ करिता महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशनच्या वतीने उमेदवारांचे पॅनल उभे करण्यात आलेले आहे या पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला. (PCMC)
सर्वसाधारण गट -किरण श्रीधर साडेकर
सर्वसाधारण गट -राजू विलास बिराजदार
सर्वसाधारण महिला गट-संगीता दत्तात्रय शेरखाने
अनुसूचित जाती गट – प्रल्हाद रामभाऊ कांबळे
अनुसूचित जमाती गट -किसन रामा भोसले
अल्पसंख्यांक गट -सलीम बाबालाल डांगे
विकलांग गट -अलका सुनील रोकडे
कप बशी या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा.
महासंघाचे आपले सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पदाधिकारी प्रयत्नशील राहतील असा पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या बैठकीमध्ये ठराव करून आज त्यांनी पत्र दिले आहे.
महासंघाचे वतीने अनेक सकारात्मक निर्णय फेरीवाल्यांच्या बाबतीत घेतलेले असून आम्ही सर्वजण मिळून सभागृहामध्ये अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत तसेच दिव्यांग प्रवर्गासह इतर सदस्य यांनी चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेवावे असे मत राजेंद्र वाकचौरे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रहार आपण क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता काळभोर, समिती पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते, रामचंद्र तांबे, ज्ञानेश्वर गायकवाड, अशोक भोपळे, भाग्यश्री मोरे,अहिरे सर, संगीता पटेल दत्ता गाडेकर, इरफान चौधरी, सहदेव होनमाने, सागर बोराडे, फरीद शेख, अंबालाल सुकवाल, तुकाराम माने आदी उपस्थित होते.
PCMC
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू
आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट
महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा