Sunday, July 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन

PCMC : कवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भारतीय संस्कृत भाषेतील अभिजात लेखक, महान कवी, नाटककार असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे महाकवी कालिदास. आषाढ शुद्ध प्रतिपदेला कालिदास यांचा जन्म झाल्याची मान्यता आहे. त्यामुळे हा दिवस ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. pcmc

कालिदासांच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश आहे.असे आयोजक हरीष मोरे यांनी सांगितले.

वर्षा ऋतूतील आषाढ महिन्यात मेघदूत, शाकुंतलकार, संस्कृतमधील अभिजात महाकवी कालिदासाच्या स्मृती दिनानिमित्त संवाद व्यासपीठ थेरगाव यांच्या वतीने कवीश्रेष्ठ कालिदास दिनानिमित्त खुले कविसंमेलन शनिवार दिनांक ६ जुलै रोजी थेरगाव येथे लक्ष्मीबाई उद्यान मध्ये दुपारी ४ वाजता आयोजित केले आहे. pcmc

कार्यक्रम अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी कैलास भैरट असून प्रमुख पाहुणे म्हणून करिष्मा बारणे, प्रदीप भिंगारे, सुहास घुमरे. चंद्रकांत सरडे. पंकज पाटील यांच्या उपस्थिती मध्ये होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कवींनी भाग घ्यावा. असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक हरीष मोरे यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय