Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ऑनलाईन पद्धतीने परवान्यासाठी अर्ज केलेल्या ४२८ गणेश मंडळांपैकी २४३ गणेश...

PCMC : ऑनलाईन पद्धतीने परवान्यासाठी अर्ज केलेल्या ४२८ गणेश मंडळांपैकी २४३ गणेश मंडळांच्या अर्जांना परवांनगी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – यावर्षी पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने गणेश मंडळांना परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली असून आतापर्यंत ४२८ गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने परवान्यासाठी ५ सप्टेंबर २०२४ पर्यत अर्ज केले आहेत. त्यातील २४३ गणेश मंडळांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. (PCMC)

शहरातील गणेश मंडळांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून परवाना उपलब्ध करून देण्याची सुविधा पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही कार्यालयात उपस्थित राहून अर्ज करण्याची गरज पडणार नाही. या प्रणालीद्वारे अगदी घरबसल्या किंवा स्मार्टफोनद्वारे सोप्या पद्धतीने मंडळांना ऑनलाईन अर्ज करणे सोपे जात आहे.

या प्रणालीद्वारे अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आतापर्यंत अनुक्रमे ९४, ६८, २८, ४३, ३९, ५७, ५३ तसेच इतर ७ असे एकूण ४२८ गणेश मंडळांचे अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यातील ८४ अर्ज अपुर्ण असल्याने रद्द करण्यात आले असून २८ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. तर ७३ अर्ज स्थापत्य विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. (PCMC)

याशिवाय सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेच्या जागेवर मंडप किंवा स्टेज व कमानी आदींसाठी परवाना शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शालेय स्तरावर पर्यावरणपूरक गणेश मुर्ती निर्मिती व सजावट स्पर्धा आयोजित करणे, नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

***

संबंधित लेख

लोकप्रिय