उल्हासनगर : वाहतूक पोलीस आणि पब्लिक मध्ये नेहमी बाचाबाची होत असतात, असाच एक उल्हासनगर (ठाणे जिल्हा) मधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती, ज्यात एक ऑटो रिक्षा चालक यांच्यात मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (Ulhasnagar)
इथे वाहतूक पोलीसावर हल्ला करतानाचे दृश्य आहे. या व्हिडिओत एक गुलाबी टी-शर्ट घाललेली व्यक्ती आणि पोलीस यांच्यात फटकेबाजी सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलावर शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तीघांपैकी एका रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. वाहतूक पोलीस आणि पब्लिक यांच्यातील वाद आता चर्चेचे बातमीचे विषय झाले आहेत. (Ulhasnagar)