डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःच्या राहत्या बंगल्याची स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही आपले आरोग्य ही आपलीच जबाबदारी समजून राहत्या घरांची साफसफाई केली असून नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी “बीट डेंग्यू” सूत्राचा अवलंब करावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. (PCMC)
शहराला डेंग्यू मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी आठवड्यात एका दिवसातील एक तास आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या राहत्या घरी स्वच्छता करायची आहे.
या मोहिमेत आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत घरातील कुलर, फ्रीज, पाणी साठवणुकीची भांडी, झाडांच्या कुंड्या, घराच्या परस बागेची स्वच्छता केली.
डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर म्हणजेच बीट डेंग्यू (BEAT dengue) या मोहीमेत जागरूकता वाढवण्यासाठी आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि डेंग्यूला रोखण हे महापालिकेचे उद्दिष्ट असून नागरी समुदायाच्या सहभाग वाढविण्यावर आणि आंतरविभागीय समन्वय राखण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्वाचा असून डेंग्यूला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
बीट डेंग्यू (BEAT dengue) मोहिमेअंतर्गत संपूर्ण आठवडाभर विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोशल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारे आणि आरोग्य विभागाच्या आयईसी टीम्सद्वारे मोहिमेचे नेतृत्व केले जात आहे.
सामुदायिक जागरूकता उपक्रमांचे नेतृत्व एमएएस, आशा आणि एएनएम करत आहेत. यामध्ये गणेश मंडळ, स्वयंसेवी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक मंच यांचा समावेश आहे. मॉल्स, थिएटर आणि उद्यानांमध्ये डेंग्यू जनजागृतीचे व्हिडिओ दाखविण्यात येत असून पॅम्प्लेट वितरण तसेच पथनाट्यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे.
बीट डेंग्यू (BEAT dengue) मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. नागरिक त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे साठे हटवून डेंग्यूचा प्रसार रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. महापालिकेसमवेत नागरिकांनी एकत्रितपणे या उपक्रमात सहभाग घेतल्याने डेंग्यूला हद्दपार करण्यास नक्कीच यश मिळेल, असे मत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी व्यक्त केले आहे.
१० मिली लिटर स्वच्छ पाणी डेंग्यू आजारांचे किटक उत्पन्न करण्यासाठी पुरेसे आहे. म्हणुन महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत “बीट डेंग्यू’ (BEAT Dengue) ही संकल्पना राबविली जात आहे.
यामध्ये (B-Be Responsible) आपल्या आजुबाजुला डासांची निर्मिती होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे, (E- Educate Ourselves) डेंग्यू आणि इतर किटक कीटकांपासून होणार्या आजाराची माहिती असणे, (A-Alert PCMC) आपल्या आजुबाजुला डेंग्यू चे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या रुग्णालयांना कळवणे, (T – Throw Away Stagnant Water) आपले घर आणि परिसरात कोठेही पाणी साचनार नाही याची दक्षता घेत पाणी साठवणूक करणारे पात्र कोरडे करणे, व स्वच्छता करणे या गोष्टींचा समावेश आहे. (PCMC)
नागरिकांनी सहभागी व्हावे
नागरिकांचे आरोग्य सुदृढ कसे ठेवता येईल यासाठी महापालिका सर्व प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘बीट डेंग्यू’ या संकल्पनेचा अवलंब करावा आणि आपले घर व परिसर स्वच्छ व कोरडे ठेवावे.
-आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
हेही वाचा :
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती
श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती