Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याPolice Bharti : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!

Police Bharti : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!

Police Bharti 2024 : राज्यात सध्या 2023 मधील रिक्त असलेल्या 17 हजार 471 पोलिसांची भरती सुरू असून 1 सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे. त्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या काळातील अंदाजे 7 हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. (Police Bharti)

अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शहर-जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांची गरज आहे, वाहतूक शाखा, क्राईम ब्रॅंच, पोलिस शिपाई अशी पदे कमी आहेत, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावेत. त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (Police Bharti)

राज्यातील 10 पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे.

तत्पूर्वी, 1 सप्टेंबरपर्यंत सध्याची 14 हजार 471 पदांची पोलिस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.

रिक्तपदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव Police Bharti

सध्याच्या 17 हजार 471 पोलिस पदांसाठी राज्यभरातून 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापूर्वी देखील 13 लाख उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या पोलिस भरतीला सुरुवात होवू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

google news gif

हेही वाचा :

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती

श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

संबंधित लेख

लोकप्रिय