Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांना मोफत आरोग्य शिबीर

PCMC : कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांना मोफत आरोग्य शिबीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : उद्योग नगरीत शनिवार 29 जून 2024 ला पालखीचे आगमन झाले. यानिमित्त कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन (KTTF) तर्फे निगडी गावठाण मारुती मंदिर येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले. PCMC

दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर, औषधे वाटप, मालिश / मसाज, केस व दाढी साठी न्हावी व्यवस्था केली होती. KTTF संस्थेतर्फे वारकरी भक्तांसाठी मोफत कटिंग व दाढी करण्याचे सेवाकार्य संजय कुमार ईशी यांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 काम केले.

तसेच वारकऱ्यांना आरोग्यवर्धक गोळ्या, औषधे वितरीत करण्यात आली.


यावर्षीचे विशेष म्हणजे तुकाराम तनपुरे फाउंडेशन व संजीवनी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने तनपुरे फाउंडेशनच्या अनेक KTTF पोलीस मित्रांनी रक्तदान केले.

निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत, दरवर्षीप्रमाणे KTTF पोलीस मित्र यांनी,पालखी बंदोबस्त केला. पालखीचे आगमन झाल्यावर स्वागत प्रवेश कक्ष ते पालखी मार्गावर भक्ती शक्ती चौक, हनुमान मंदिर, टिळक चौक, महाराष्ट्र बँक, दत्तवाडी चौक या ठिकाणी KTTF पोलीस मित्रांनी बंदोबस्त केला.

यावेळी पोलीस मित्रांनी पालखी आकुर्डी येथे पोहचल्यावर, भक्ती शक्ती चौक ते टिळक चौकापर्यंत स्वच्छता अभियान राबवले. पालखीच्या मुक्कामी विठ्ठल रखुमाई मंदिर आकुर्डी येथे KTTF पोलीस मित्रांनी नाईट पेट्रोलिंग केले. व आकुर्डीतून पुणे येथे प्रस्थान मार्गावर खंडोबा चौक, ते आंबेडकर चौक पिंपरी पर्यंत पालखी बंदोबस्तासाठी KTTF पोलीस मित्रांनी शहर पोलिसांना मदत केली. pcmc

वैद्यकीय आरोग्य शिबिरासाठी प्रामुख्याने धनश्री हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल, निदान क्लिनिक, धन्वंतरी क्लिनिक, अनुभूती आयुर्वेद चिकित्सालय, विश्व भारत आयुर्वेद चिकित्सालय, विश्वहरी आयुर्वेद क्लिनिक, अश्वथा आयुर्वेद, व संजीवनी क्लिनिक आणि माऊली आयुर्वेद इ. हॉस्पिटल्स यांच्या वतीने वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले.

उद्योग, व्यावसायिक अधिकाऱ्यांनी दिले योगदान

पानसे ऑटो लिमिटेड चेअरमन श्री राजीव पानसे , एच आर ऑफिसर सुरेश नायर साहेब, मॅक्स इंडिया लिमिटेडचे गुरुप्रसाद कनोजिया, विनीश चुघ, नरेश चुघ, संजय चौधरी, बंडू काकडे, प्रशांत भांड व विक्रम ढेकणे चिंचवड-दवा बाजार, यांनी आरोग्य शिबिर आयोजना साठी लागणारे साहित्य मेडिसिन्स, औषधे, जेवण, नाश्ता, चहा इत्यादी वस्तू रुपी भरीव मदत केली.
तसेच काही मेडिकल्स, हॉटेल्स, शहरातील दानशूर व्यक्ती व काही पोलीस मित्र या सर्वांच्या वस्तुरूपी योगदानातून कार्यक्रम यशस्वी झाला. pcmc

मुख्य व्यवस्थापक वासुदेव काळसेकर, नितीन मोरे, विजयकुमार आब्बड, मोशी विभाग प्रमुख स्मिता सस्ते, सागर दादा सुपल, ओम घोने, शीला कालेकर प्रथमेश आंबेरकर, कांतीलाल हरिणखेडे, मुकेश चुडासामा, देवजी सापरिया अशा अनेकांनी वस्तू रुपी मदत देऊन आपले योगदान केले.

काही राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अधिकारी व समाज घटकातील मान्यवर व्यक्तींनी वैद्यकीय आरोग्य शिबिराला भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रामुख्याने, महा. प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित गोरखे भाजपा व मनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी आरोग्य शिबिराला भेट दिली. यांनी सर्व पोलीस मित्रांच्या सेवाकार्याचे कौतुक केले.

तनपुरे फाउंडेशन च्या वतीने अध्यक्ष अशोक तनपुरे यांनी पुष्प गुच्छ व नारळ देऊन त्यांचे आभार मानले. संस्थेचे आधारस्तंभ वासुदेव काळसेकर, अध्यक्ष अशोक तनपुरे, कार्याध्यक्ष विजयकुमार आब्बड, स्मिता सस्ते, नितीन मोरे, लक्ष्मण शिंदे, कुणाल बडीगेर आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व डॉक्टर्स व त्यांचे सहकारी यांना पुष्पगुच्छ नारळ देऊन आभार व्यक्त करुन आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराची सांगता झाली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात जोरदार आंदोलन, उपमुख्यमंत्र्याकडून कामाला स्थगिती

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

संबंधित लेख

लोकप्रिय