वाढती महागाई, बेरोजगारी , टाळेबंदी ही भारतीयांसाठी सर्वात मोठी चिंता
दापोडीतील कार्यकर्त्यांचा आढावा बैठकीत एल्गार
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना ,(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांना लोकसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरून गद्दारांना त्यांची जागा दाखवून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्याचा एल्गार यावेळी करण्यात आला.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सोशल मिडीया, फेसबुक आणि जनसंपर्क याचा वापर करून तळागाळातील जनते पर्यंत पोहचून मावळचे (Maval loksabha) शिलेदार संजोग वाघेरे पाटील याना लोकसभेत पाठविण्याचा मानस दापोडीकरांनी व्यक्त केला.
चिंचवड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. विजयी गुलाल आपलाच असेल, अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.
या वेळी तुषार नवरे, अखिल शेख, शिवाजी काटे, वसंत काटे, राजेंद्र काटे, राजेंद्र भिकोबा घाटे, प्रशांत तुपे, अमोल जाधव, गोपाळ मोरे यांच्यासह दापोडीतील युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. PCMC NEWS
सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोते पाटील म्हणाले कि, शहरी भारतीय वाढत्या महागाई आणि नोकरीच्या सुरक्षेबद्दल चिंता आहे, ज्यात टाळेबंदीच्या भीतीचा समावेश आहे. त्यामुळे टाळेबंदी ही भारतीयांसाठी सर्वात मोठी चिंता आहे. शेतकऱ्यांना उस, कांदा याला पाहिजे तसा भाव मिळत नाही, गेल्या २०१४ पासून या भाजपच्या काळात देशातील जनतेचे नुकसान झाले आहे. देश कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत जनता भाजपला घरी बसविल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून ‘भाजप हटाव, देश बचाव ‘ असा नारा दापोडीतील युवा कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे या वेळी दिला. PCMC NEWS
यावेळी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, मावळ लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी जनता मात्र आता गप्प बसणार नाही. गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही. मावळ लोकसभेत (Maval loksabha) आजतागायत सर्वांगीण विकास झालेला नाही. गेला दहा वर्षात मावळच्या विकासाचे व्हिजनचे काय झाले. महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जात आहेत, तरुणांना रोजगार नाही. बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे समाजाशी नाळ असलेले समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचणारे आपला उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करून मावळ लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकवून, एकदिलाने काम करून त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून देण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली. PCMC NEWS
शिवरायांच्या महाराष्ट्र ! इथे गद्दारांना थारा नाही !!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांना लोसभेत पाठवून गद्दारांना घरी बसवू, असा इशारा दापोडीतील कार्यकर्त्यांनी दिला. महाराष्ट्रातील जनतेला “पन्नास खोके एकदम ओके” हे कळायला लागले आहे. आता लोक मावळ लोकसभा मतदार संघात (Maval loksabha) यांना योग्य उत्तर देतील, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीत झालेली गर्दी हीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाची नांदी आहे. त्यामुळेच शिवरायांच्या महाराष्ट्र ! इथे गद्दारांना थारा नाही !! अशी रोखठोक भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.