Tuesday, May 7, 2024
Homeताज्या बातम्याAIKS : 7 एप्रिल ला राज्यव्यापी शेतमाल हमी दर मागणी परिषद 

AIKS : 7 एप्रिल ला राज्यव्यापी शेतमाल हमी दर मागणी परिषद 

वर्धा : अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने दिनांक 07 एप्रिल 2024 रोजी राज्यव्यापी शेतमाल हमी दर मागणी परिषदेचे आयोजन शिववैभव मंगल कार्यालय, बॅचलर रोड, आर्वी नाका, वर्धा येथे करण्यात आले आहे. Statewide Agricultural Commodity Guarantee Rate Demand Conference on 7th April

या परिषदेचे उद्घाटन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे करणार असून शेतकरी नेते विजय जावंधिया हे परिषदेचे अध्यक्ष असतील. तर शेतकरी नेते किशोर माथनकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या परिषदेला किसान सभेचे राज्य सचिव, शेतकरी नेते डॉ.अजित नवले, राज्य अध्यक्ष उमेश देशमुख हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून अॅड. डी. एन. हिवरे हे स्वागताध्यक्ष आहेत.

शेतमालाला हमी भावाचा कायदा करा, शेतमालावरील निर्यातबंदी हटवा, स्वामिनाथन शेतकरी आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीला पुर्णवेळ वीजपुरवठा करा, जंगली जनावरांपासून संरक्षण द्या, शेतमालाला योग्य भाव द्या, शेतमजूरांना घरे व घरकुल योजनेचा लाभ द्या, वयोवृद्ध शेतकरी शेतमजूरांना पेंशन द्या या मागण्यांसाठी ही परिषद होत आहे.

या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, वर्धा जिल्हा सचिव जगन चांभारे, जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शिनगारे, कार्याध्यक्ष अविनाश जरिले यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय