Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जीतोच्या अहिंसा (marathon) रॅलीला मोठा प्रतिसाद

PCMC : जीतोच्या अहिंसा (marathon) रॅलीला मोठा प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन(JITO) पिंपरी चिंचवड चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “अहिंसा” मॅरेथॉनमध्ये शेकडो नागरिक धावले.

रविवारी सकाळी चिंचवड पवना नगर PCMC येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाचे मैदान येथून या मॅरेथॉनला प्रारंभ झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पो आयुक्त खेळाडू मनोहर जोशी, जैन प्रसारक मंडळाचे सचिव राजेंद्र मुथा, आय आय एफ एलचे सुनील सोनवळे, उद्योजक जिगर व्यास, स्मिता व्यास,अमुल दुधाचे रिजनल हेड संदीप नंदा, जीतो सल्लागार समितीचे संतोष धोका, तृप्ती कर्नावट, नवनीत बोरा, संतोष संचेती पदाधिकारी उपस्थित होते. PCMC NEWS

जोशी यावेळी म्हणाले कि, या रॅलीमध्ये मी प्रथमच धावलो. स्पर्धेत सहभागी व्हायचे असते कारण आपली कितपत कार्यक्षम आहोत.याची जाणीव होते. यामुळे आपल्याला किती मेहनत घ्यायची. याचा अंदाज येतो.केवळ बक्षीसासाठी स्पर्धेत सहभागी व्हायचे नसते.अनुभव घेण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले पाहिजेत.

बिजलीनगर- भेळ चौक- लाल बहादुरशास्त्री चौक- निगडीतील कृष्णा हॉटेल पर्यंत पुन्हा याच मार्गाने चिंचवड च्या जैन शाळा मैदान या मार्गाने हि मॅरेथॉन (marathon) झाली.१० किमी, ५ किमी, ३ किमी या तीन गटात हि मॅरेथॉन संपन्न झाली.

अहिंसा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी देशातील ६८ तर विदेशातील जीतोच्या २७ चॅप्टरने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनची गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

या मॅरेथॉनमध्ये सातशे नागरीक धावले . अशी माहिती महासचिव योगेश बाफना यांनी यावेळी दिली. यावेळी कॉर्फबॉल स्पर्धेत विजेत्या ७ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. PCMC NEWS

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष मनिष ओसवाल,मुख्य सचिव योगेश बाफना,खजिनदार सीए संतोष संचेती,जीतो महिला विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना, सचिव योगिता लुंकड, खजिनदार सारिका सोलंकी, जीतो युवा अध्यक्ष सौरभ बेदमुथा, सचिव प्रणव खाबिया, खजिनदार पुष्पक जैन आदिंनी पुढाकार घेतला.

सूत्रसंचालन मुकुल मोरे, यांनी तर आभार योगीता लुंकड यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय