Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयRahul Gandhi : पंतप्रधान मोदी 'मॅच फिक्सिंग' करत आहेत - राहुल गांधी

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी ‘मॅच फिक्सिंग’ करत आहेत – राहुल गांधी

दिल्लीच्या रामलीला मैदान येथील महामेळाव्यात टीका

नवी दिल्ली : ‘ भाजप ४०० जागा जिंकण्याचा दावा करीत आहे. काँग्रेस मोठा विरोधी पक्ष (opposition party) आहे आणि त्यांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. दोन मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. जेव्हा अंपायरवर दबाव टाकून, प्लेअरला खरेदी करुन, कॅप्टनला घाबरवून मॅच जिंकली जाते. क्रिकेटमध्ये त्याला मॅच फिक्सिंग (match fixing) म्हटले जाते. ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे. चार-पाच अब्जाधीशांना हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅचफिक्सिंग’ करीत आहेत. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.


आमच्या दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. हे करायचे होते तर ते सहा महिन्यांपूर्वी, वर्षभरापूर्वी करता आले असते. तुम्हाला आमची खाती गोठवायची होती, ती तुम्ही ते सहा महिन्यांपूर्वी गोठवली असती. पण तुम्हाला ते आता करायचं होतं, जेणेकरून मॅच फिक्सिंग होऊ शकतं. असे राहुल गांधी म्हणाले.


INDIA आघाडीच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ झालेल्या सभेत (दि.३१ मार्च) विरोधी पक्षाचे नेते दिल्लीतील रामलीला मैदानावरील लोकतंत्र बचाओ महारॅली मध्ये उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, समाजवादी प्रमुख अखिलेश यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, आप नेते आतिशी, गोपाल राय, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती, सुनीता केजरीवाल आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आदी उपस्थित होते. Delhi news

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय