वाहतूक नियोजनासाठी मदत, अवजड वाहनास मनाई (PCMC)
माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दाट लोकवस्ती आणि वर्दळीचा परिसर असलेल्या यमुनानगर परिसरातून अवजड वाहने जात असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने उंच बॅरियर बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे.
माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केलेल्या मागणीनुसार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला उंच बॅरियर बसविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कन्हैया स्वीट आणि कावेरी इमारतीसमोर उंच बॅरियर बसविण्यात येणार आहेत. (PCMC)
निगडी परिसर झपाट्याने विस्ताराला आहे. या भागात मोठी लोकसंख्या आहे. दाट लोकवस्तीचा हा परिसर आहे. दुर्गानगर चौकाकडून चिकन चौकाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. रस्त्याच्या लगत रहिवासी घरे आहेत. दुर्गानगर चौक ते चिकन चौक, यमुनानगर निगडी व परिसरात आगीची दुर्घटना घडली. तर, दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाच्या वाहनांना त्वरित पोहोचण्यास विलंब होतो.
रस्त्यालगत दाट मनुष्यवस्ती आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जड, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उंच बॅरियर बसविण्याची मागणी माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रशासनासह आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. (PCMC)
त्यानुसार आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना बॅरियर बसविण्याची सूचना केली. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यमुननगर येथील पोलीस चौकीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या जड, अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी उंच बॅरियर बसविण्याची परवानगी महापालिकेला दिली.
त्यामुळे कन्हैया स्वीट आणि कावेरी इमारतीसमोर उंच बॅरियर बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्निशमन वाहनांची उंची विचारात घेऊन हाइट बॅरियरची बांधणी करावी. त्याची उंची मर्यादा 4 मीटर करण्याची सूचना अग्निशमन विभागाने फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना केली आहे. त्यानुसार लवकरच बॅरियर बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
रस्ते सुरक्षा आणि अपघात नियंत्रण
निगडी, यमुननगर परिसरात दाट लोकवस्ती आहे. जड, अवजड वाहने यमुनानगर पोलीस चौकीसमोरून भक्ती-शक्ती पुलाकडे जात होते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन गाड्या जाण्यासही अडथळा येत होता.
आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने आता कन्हैया स्वीट आणि कावेरी इमारतीसमोर उंच बॅरियर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे जड, अवजड वाहतूक बंद होईल.
– प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसेवक, निगडी.