Wednesday, November 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ज्ञानराजच्या विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याचा संदेश

PCMC : ज्ञानराजच्या विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याचा संदेश

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १९ .. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी बुधवारी सकाळ पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून राज्य सरकार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व विविध शैक्षणिक तसेच सामाजिक संस्था, संघटना मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहेत. विविध माध्यमातून मतदान करण्याचा संदेश देत आहेत. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते सर्वांनी पार पाडावे. “मतदान करा” असा संदेश देत पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी येथील ज्ञानराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणावर कलाकृती सादर केली. (PCMC)

कासारवाडी येथील ज्ञानराज विद्या प्रसारक मंडळ संचलित ज्ञानराज माध्यमिक विद्यालयातर्फे वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी मतदारांना व आपल्या पालकांना मतदार करण्याचा संदेश दिला. (PCMC)

विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब थोरात, कार्याध्यक्ष संजय शेंडगे, सचिव दीपक थोरात, मुख्याध्यापिका उर्मिला थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकृती सादर करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब थोरात यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

संबंधित लेख

लोकप्रिय