Monday, December 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महाराष्ट्र विधानसभेसाठी आणि समृद्ध लोकशाहीसाठी १०० टक्के मतदान करा -...

PCMC : महाराष्ट्र विधानसभेसाठी आणि समृद्ध लोकशाहीसाठी १०० टक्के मतदान करा – नागरिकांना आवाहन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात ५ कोटी २२ हजार ७३९ पुरूष मतदार आणि ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. (PCMC)

थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५९९७ असून, दिव्यांग मतदारही (पीडब्ल्यूडी) ६.३२ लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्ड जेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. (PCMC)

हे सदृढ समाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे १८/१९ वयोगटातील मतदारांची संख्या १९.४८ लाख आहे.
—————
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक संस्था संघटना १०० टक्के मतदानासाठी आवाहन करत आहेत.

काही मोजक्या प्रतिक्रिया
———-
एक एक मत अमूल्य असते : सलीम सय्यद, अध्यक्ष, वुई टुगेदर फाउंडेशन

जगातील हुकूमशाही राष्ट्रात विशेषतः अरब राष्ट्रे, आफ्रिका खंड, कम्युनिस्ट देशात सरकार, अध्यक्ष किंवा सत्ताधारी बदलण्यासाठी लोकांना अजूनही मतदानाचे अधिकार नाहीत. युरोप मध्ये इंग्लंड, नॉर्वे, फ्रान्स, बेल्जियम आदी देशात महिलांना मतदानाचे अधिकार खूप उशिरा दिले, विशेषता दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये सर्वांना मतदानाचे अधिकार मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसह सर्वांना मतदान अधिकार मिळवून दिले.

भारत हा आशिया खंडातील तसाच जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, ज्या देशात १०० टक्के मतदान होते ती राष्ट्रे विकसित होत गेली. आपण सर्वजण सुजाण नागरिक आहोत, आपण प्रत्येकाने मतदान करून १०० टक्के मतदान करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले पाहिजे.
—————-
समृद्ध लोकशाहीसाठी १०० टक्के मतदान करा : रवींद्र काळे, अध्यक्ष, लायन्स क्लब, कार्पोरेट, चिंचवड

केरळ, गोवा, मेघालय,अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतातील राज्यात तसेच हिमाचल प्रदेश येथे ७० ते ८० टक्के लोक मतदान करतात. तुलनेने महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यात ही प्रमाण ६० टक्केच्या आसपास आहे. याचा अर्थ अनेक लोक मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडत नाहीत, किंवा सुट्टी एन्जॉय करतात.

त्यांना निवडून आलेल्या सरकार बद्दल बोलण्याचा अधिकार नाही. लोकशाही मध्ये मतदान करून आपण सरकार निवडू शकतो तर मग ते सरकार फक्त 30%-40% मताधिक्याने का येते? याला कारण आपल्याकडे मतदानच कमी होते. आणि मग निवडुन आलेलं सरकार ला आपण शिव्या देतो, पण जर का आपण मतदानच केलेलं नाही तर कसे काय आपण कोणाला बोलायचे?
———————-
एका मताने पडले होते, वाजपेयी सरकार, समृद्ध लोकशाहीसाठी १०० टक्के मतदान करा जागृत नागरिक : मधुकर बच्चे, सदस्य महावितरण समिती

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार १९९९ मध्ये सत्तेत होतं. अनेक पक्षांच्या आघाडीचे हे सरकार होत. लोकसभेत अविश्वास ठरावाचे वेळी एआयएडीएमकेने पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकारला संसदेत अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी झालेल्या मतदानात सरकारच्या बाजूने २६९ मतं पडली तर विरोधात २७० मतं. त्यामुळे एका मताने अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येक मत हे पवित्र असते, १०० टक्के मतदान करा.

हे ही वाचा :

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी

Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)

संबंधित लेख

लोकप्रिय