पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आषाढी वारी निमित्त पायी दिंडीत वारी करणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम रहावे, पायी वारी करताना आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेली 35 वर्ष झाले मोफत औषधे सेवा दिली जाते. PCMC
पुणे ते पंढरपूर अशी निरतर औषधे सेवा दिली जाते.या सेवेत ‘मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य मेडिको ग्रुप’ लोकसहभागातून गेल्या 14 वर्षांपासून पंढरपूर पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात मोफत औषधे दिली जातात.
या वर्षी सुद्धा लोकसहभागातुन या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यासाठी मोफत औषधे व अन्य वस्तू देण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव, मधुकर बहिरू बच्चे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम गेले 14 वर्षे अविरत सुरु आहे. या उपक्रमात अनेक डॉ.. फार्मासिस्ट, नर्स, स्वयंसेवक, अँब्युलन्स,आदी या उपक्रमास पंढरपूर पर्यंत सेवा देतात.
शुगर, बीपी, सर्दी, खोकला, ताप जुलाब, काही सर्जरी, आदि साथीच्या आजारात औषधे, प्रथमोपचार करिता आवश्यक सर्व प्रकारची औषधे, तसेच बिस्किटे, काही आवश्यक वस्तू या उपक्रमात लोकसहभागातून मोठ्या प्रमानात गोळा केल्या जातात.
या वर्षी जास्तीत जास्त औषधे, पैसे, अन्य आवश्यक लागणाऱ्या वस्तू जास्तीत जास्त जमा करण्याचा संकल्प आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी हातभार लावून आपण सढळ हस्ते मदत करावी, असे विनम्र आवाहन जनसेवक मधुकर बच्चे, सदस्य -महाराष्ट्र महावितरण समिती, सचिव:भाजपा पिं.चिं. शहर यांनी केले आहे. pcmc news
मदत पुढील ठिकाणी जमा करू शकता
७३८५५४६६८१ / ९१४६८९५१०
१) चैतन्य मेडिको स्टोअर्स,येशोगंध सोसायटी, केशवनगर चिंचवड.
२) चैतन्य डायगनोस्टिक सेंटर डॉ. लाल पॅथलॅब्स, विवेक वसाहत केशवनगर काकडे पार्क चिंचवड.
३) चैतन्य केमिस्ट अँड स्टोअर्स, गावडे मेंशन, गोलांडे इस्टेट, केशर हॉटेल, चिंचवड
४) डॉ. लाल पॅथलॅब अँड चैतन्य डायगणोस्टिक सेंटर, रावेत
माझ्या कार्याविषयी अधिक माहिती साठी माझे मधुकर बच्चे फेस बुक नक्की पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय