Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भिडे विरोधात गुन्हा दाखल करा - सामाजिक संघटनांचा आयुक्त कार्यालयावर...

PCMC : भिडे विरोधात गुन्हा दाखल करा – सामाजिक संघटनांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : दि.१०-संभाजी भिडे ग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पिंपरी चिंचवड संघर्ष समितीच्या वतीने आज (दि.१०) पोलीस आयुक्तांलयावर धडक मोर्चा काढला होता. या पिंपरी चिंचवड संघर्ष समितीच्या मोर्च्यात शंभराहुन अधिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. चिंचवड येथील दळवीनगर येथून निघालेला हा मोर्चा पोलिसांनी बॅरिकेड लावून अडवला. समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन खालील मागण्या केल्या.



सांगली येथील मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिड़े हे महाराष्ट्रामध्ये धर्मा-धर्मात आणि जाती-जातीत तेढ निर्माण करणारी, समाजात दुफळी निर्माण करणारी, देशातील महामानवांचा अवमान करणारी, सामाजिक सलोखा आणि शांतता भंग करणारी, कायदा आणि सुव्यवस्थेला सुरुंग लावणारी, देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी देशद्रोही वक्तव्ये लागोपाठ करीत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य दिन, महात्मा फुले, छत्रपती संभाजी महाराज, शिव-स्मारक, गौतम बुद्ध, साईबाबा, फुले-शाहू-आंबेडकर, संत तुकाराम ई देशाच्या प्रतिकांचा अपमान करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये मनोहर भिडे यांनी वारंवार केली आहेत.


राष्ट्र पुरुषांचा अपमान करणारी अन्य लागू होणारी अॅट्रोसिटी कायदा, कलम १५३ ए, २९५ ए, भारतीय दंड संहिता कलम ५००, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, राष्ट्रीय सन्मानांचा अपमान प्रतिबंधक कायदा, जादूटोणा विरोधी कायदा, अशा कायद्याअंतर्गत मनोहर उर्फ संभाजी भिडे या समाजकंटक इसमवर त्वरित गुन्हा नोंदवावा, अशा मागण्या समितीच्या वतीने करण्यात आल्या.


यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी, “गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात त्या पूर्ण होतील. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.” मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, काशिनाथ नखाते, धनाजी येळकर, सतीश काळे, मनोज घरबडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय