पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त २७०० रोपांचे वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. नुकतेच अरुण पवार (Arun Pawar) यांनी भंडारा डोंगरावर वृक्षारोपण केले. वृक्ष लागवड चळवळ वाढली पाहिजे या हेतूने त्यांनी लग्नाच्या वाढदिवशी त्यांनी सदर उपक्रम राबवला. PCMC
यामध्ये मलकप्पा शिवशरण यांना १०० रोपे, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेसाठी संस्थापक अध्यक्ष संतोष सुरवसे यांच्याकडे १०० रोपे, पंडीतगुरु पार्डीकर महाविद्यालय परळी यांना ११०० रोपे घेण्यासाठी अकरा हजार रुपयांचा निधी, सुदिक्षा फाउंडेशन १०० रोपे, विजय वाघमारे फाउंडेशन २०० रोपे जनकल्याण प्रतिष्ठानसाठी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्याकडे ७०० रोपांचे वाटप करण्यात आले आहे. (Distribution of saplings on wedding anniversary)
तसेच ज्या संस्थांना रोपे पोहोच करणे शक्य नव्हते, त्या संस्थांना निधी देऊन रोपे खरेदी करण्यास सांगितले आहे. अनेक संस्थांना २५ ते ५० झाडांचे वाटप केले आहे. यामध्ये पिंपळ, वड, करंज, आवळा, चिंच, कडुलिंब, चिकू, शिताफळ, नारळ, जांभूळ, आंबा, पेरू, लिंबू आदींची ५ ते ६ फूट उंचीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. pcmc
वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले, संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे सांगत झाडांचे महत्त्व सांगितले. महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. त्याच वर्गाने तुकाराम महाराजांवरील श्रद्धेपोटी एक झाड घरोघरी लावण्यासाठी पुढे येऊन जलसंवर्धन, पर्जन्यमानात सुधारणा होईल. pcmc news
वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन याचा निश्चय केला तर राज्यात वनराईचे चित्र निश्चितच बदलेल. निसर्गातील वातावरण धोकादायक तप्त झाले आहे, लग्नाचे व इतर वाढदिवस साजरे करताना इतर कार्यक्रमावर खर्च करण्याऐवजी वृक्षलागवड चळवळ करावी, असे मत अरुण पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये
सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!
ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी
ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ
मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त