Thursday, May 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिखली जाधववाडी पंतनगर येथील तुंबलेल्या नाल्याची स्वच्छता करा - रोहन...

PCMC : चिखली जाधववाडी पंतनगर येथील तुंबलेल्या नाल्याची स्वच्छता करा – रोहन चव्हाण

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : चिखलीतील सार्वजनिक स्वछता,नागरी आरोग्यकडे मागील काही वर्षापासून मनपा प्रशासनाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून सतत दुर्लक्ष होत आहे. दैनंदिन रस्ते सफाई व्यतिरिक्त जन आरोग्याशी संबंधित परिसरातील तृतीकडे आरोग्यविभागाचे लक्ष नसते.



चिखली जाधववाडी पंतनगर कॉलनी न 1 येथील नाला मैलामिश्रित सांडपाणी व दुर्गंधीयुक्त कचऱ्याने तुबलेला आहे, त्यामुळे येथे डेंग्यू मलेरिया सारखे आजार होऊन नागरी आरोग्य समस्या निर्माण होत आहे. येथील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई परिपूर्ण झालेली नाही.


मागील दोन आठवड्यापासून तुंबलेल्या या नाल्याची सफाई प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे येथील नागरिक दुर्गंधी व मच्छरांच्या त्रासाने हैराण झालेले आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही करून नालेसफाई करावी, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण यांनी आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय