पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभेत खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चिंचवड विधानसभेचे नेते माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वात चिचंवड विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भेटून सत्कार केला. pcmc news
पुणे जिल्ह्याला सुनेत्रा पवार यांच्या रूपाने तिसरी महिला खासदार मिळाली आहे. गेली २० वर्ष सुनेत्रा पवार या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. काटेवाडी निर्मलग्राम करण्यापासून त्यांनी त्याच्या कार्यास सुरवात केली.
एन्वहायमेंटल फोरमच्या माध्यमातून ओढा खोलीकरण, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबीर, वृक्षारोपण, कर्करोग जागृती, त्याच्यां ओढा खोलीकरण या उपक्रमामुळे अनेक गावे त्यांनी टँकरमुक्त केली आहेत.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामुळे अनेकांना दृष्टी मिळाली. त्यांच्या याच जनतेशी संवाद आणि काम करण्याची पद्धत यामुळे त्यांना पक्षाने राज्यसभा खासदारपदी संधी दिली.
यापुढे पक्षाच्या संघटनेत त्याच्या कार्याचे विशेषत: महिला संघटनेसाठी सुनेत्रा पवार योगदान मोलाचे ठरणार आहे, असे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी म्हटले आहे. (MP Sunetra Pawar for Women’s Organization will be a valuable contribution to the party organization) आज पुण्यात सुनेत्रा पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विधी समितीचे माजी अध्यक्ष संतोष कोकणे, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस शिरीष साठे, युवानेते शाम जगताप, तानाजी जवळकर, बापू कातळे, सागर कोकणे, चंद्रकांत तापकीर, उमेश काटे, सचिन काळे, प्रशांत सपकाळ, पैलवान अजय कदम,विक्की साठे, आकाश साठे, निखिल घाडगे, प्रशांत देवकाते उपस्थित होते. pcmc
हेही वाचा :
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये
सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!
ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी
ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय