Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : माझी लाडकी बहीण योजना - आयुक्त शेखर सिंह यांची विविध...

PCMC : माझी लाडकी बहीण योजना – आयुक्त शेखर सिंह यांची विविध केंद्रांवर भेट

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महापालिकेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या काही अर्ज स्विकृती केंद्रांवर आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज भरण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांशी देखील त्यांनी संवाद साधला. (pcmc)

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज भरणे तसेच स्विकृतीसाठी महापालिकेच्या (pcmc) वतीने शहरात विविध ठिकाणी १० जुलै २०२४ पासून शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. (pcmc)

यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय विविध ठिकाणी १२३ अर्जस्विकृती केंद्र उभारण्यात आली असून आज आयुक्त सिंह यांनी काही केंद्रांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज भरण्यासंदर्भातील प्रकीयेबाबत पाहणी केली. तसेच यासंदर्भात येणा-या अडचणी जाणून घेतल्या. काही अडचणींचे तात्काळ निराकरण करुन त्यावर उपाययोजना सांगितल्या. (pcmc)

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी वेळेची व श्रमाची बचत व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन पात्र महिलांचे अर्ज भरण्यात येत आहेत याबाबतचा आढावा देखील आयुक्त सिंह यांनी घेतला. (pcmc)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय