Wednesday, November 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांची महानगरपालिकेस भेट

PCMC : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांची महानगरपालिकेस भेट

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून प्रत्यक्ष कामातून ते समाजासमोर आदर्श उभा करत असतात. सेवा बजावताना या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी केली. (PCMC)

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट देऊन पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत कायम तसेच कंत्राटी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच विविध संघटनाकडून बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देखील एम. व्यंकटेशन यांनी दिले. (PCMC)

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या आढावा बैठकीस राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांचे खाजगी प्रधान सचिव शशांक सिंह यांच्यासह महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उपआयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, राजेश आगळे, अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, डॉ.अंकुश जाधव, उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, सहायक आयुक्त तानाजी नरळे, अजिंक्य येळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, यांच्यासह महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक राकेश बेद, पुणे जिल्हा दक्षता समितीचे सदस्य अॅड. सागर चरण यांच्यासह सर्व सहायक आरोग्याधिकारी, सफाई कर्मचारी तसेच संबंधित सफाई ठेकेदार उपस्थित होते. (PCMC)

एम. व्यंकटेशन यांनी महापालिका प्रशासनाला सफाई कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विविध सूचना केल्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना प्राध्यान देवून त्या वेळेत सोडविल्या गेल्या पाहिजेत, सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करावे, सफाई कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचे वितरण विहीत वेळेत करावे, सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढून त्यांची आरोग्य तपासणी देखील करावी.

प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर त्यांच्या रक्तगटासह विमा पॉलिसी क्रमांक, आपत्कालीन संपर्क क्रमांक आदी महत्वाच्या बाबी आवर्जून नमूद कराव्यात. सर्व कर्मचाऱ्यांना वेतन प्रमाणपत्र वेळेत देण्यात यावे, वारसाहक्क आणि अनुकंपा तत्वावर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारे लाभ आणि नोकरी याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना माहिती देऊन अशी प्रकरणे वेळेत निकाली काढावीत.

महिला विषयक तक्रार निवारण करण्यासाठी विशाखा समितीबद्दल सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना माहिती अवगत करावी आदी सूचना एम. व्यंकटेशन यांनी बैठकीत दिल्या. (PCMC)

आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना देत असलेल्या विविध सेवा सुविधा आणि योजनांबद्दल माहिती दिली. कोणतीही प्रक्रिया राबविताना त्यातील उणीवा दूर करणे आवश्यक असते. सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्व समस्या आणि त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे आयुक्त सिंह यांनी यावेळी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानातील सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय होते, त्यामुळे शहराचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत झाली आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून त्यांना विविध सुविधा देण्यासाठी देखील महापालिकेने नियोजन केले आहे.

या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असून त्यांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत विविध शैक्षणिक कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त सिंह यांनी दिली. (PCMC)

सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करणे, वैयक्तिक संरक्षणात्मक साहित्याचे वाटप वेळेत करणे आदी बाबींवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शिवाय कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासह त्यांचे विविध प्रश्न आणि तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देवून त्याची पुर्तता करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा केला जातो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, आरोग्य विमा योजना, श्रमसाफल्य योजना, शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना देण्यासाठी महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

दरम्यान, वारसा हक्क आणि अनुकंपा तत्त्वावर ३ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिका सेवेत घेण्यात आले असून याबाबतचे नियुक्तीपत्रक त्यांना एम. व्यंकटेशन यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

बैठकीत विविध संघटनांनी देखील विविध प्रश्न मांडले. बैठकीचे सुत्रसंचालन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तसेच आभारही मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संबंधित लेख

लोकप्रिय