Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMAHESH LANDGE : कोरोना संकटात मोठ्या भावाप्रमाणे आमदार महेश लांडगे मदतीसाठी धावले!

MAHESH LANDGE : कोरोना संकटात मोठ्या भावाप्रमाणे आमदार महेश लांडगे मदतीसाठी धावले!

उत्तर भारतीयांची भावना; कुटुंबाप्रमाणे पाठीशी उभे राहू (MAHESH LANDGE)

आमदार लांडगे यांच्या महाविजयासाठी केली एकजूट


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर मोठ्या भावाप्रमाणे या शहरात आमच्या मदतीसाठी कोणी धावले असेल, तर ते आमदार महेश लांडगे होते. कोरोनातील त्यांचे सहकार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्ही कुटुंबापासून लांब होतो. मात्र, त्यावेळी आमची कुटुंब प्रमाणे काळजी घेतल्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभे असल्याची भावना पूर्वांचल विकास मंचद्वारे आयोजित उत्तर भारतीय संमेलनात व्यक्त करण्यात आली. (MAHESH LANDGE)

पूर्वांचल विकास मंच यांच्यावतीने उत्तर भारतीय संमेलनाचे भोसरी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार तथा भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी हे उपस्थित होते. यावेळी उत्तर भारतीय नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उत्तर भारतीय मोर्चाचे आकाश भारती, आकाश नेताजी सिंग ,विकास मिश्रा, बबलू सानेकर, अनुज मिश्रा, मिहीर झा, अशोक कुमार दास आदी उपस्थित होते.


उत्तर भारतीय संमेलनामध्ये आमदार महेश लांडगे यांना विधानसभा निवडणुकीसाठी समाजाच्या वतीने समर्थन पत्र देण्यात आले. यावेळी उत्तर भारतीय नागरिक भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड शहरात 2020 मध्ये कोरोना संकट आले.

आमचे अनेक बांधव या भागांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेले आहेत. कोरोना संकटात कुटुंबापासून दूर असलेले अनेक जण या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांच्या रोजच्या जगण्याची लढाई सुरू होती.त्यावेळी आमदार महेश लांडगे त्यांच्या मदतीसाठी धावून आले. अनेक जणांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यावेळी त्यांना वैद्यकीय मदत अन्नधान्य, अशा प्रकारची मदत पुरवण्यात आली. मुख्य म्हणजे या संकटातून सावरण्यासाठी दिलासा देण्याचे काम आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले अशा भावना या संमेलनामध्ये व्यक्त करण्यात आल्या.

प्रतिक्रिया :
सेवा, समर्पण भावनेतून आपले काम करत राहायचे ही भाजपची शिकवण आहे. हा मतदारसंघ म्हणजे माझे कुटुंब आहे. त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कुठलीही अडचण येऊ नये हीच माझी सर्वप्रथम भावना असते. या भावनेतून मी गेली दहा वर्षे काम करत आहे..या कामाची पावती नागरिकांकडून मिळणार हा माझा विश्वास आहे. (MAHESH LANDGE)

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

लग्नसराईत सोनं झालं स्वस्त ; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय