पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड (pcmc) शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम भागातील आदिवासी,गोर गरीब शेत मजुरांच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या ‘वुई टुगेदर फाऊंडेशन’ (WE TOGETHER FOUNDATION) या सेवाभावी संस्थेच्या सल्लागारपदी चिंचवड येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या सर्व समावेशक ध्येयधोरणा अंतर्गत नागरी समस्या निवारणासाठी शासकीय प्रशासनिक विविध अधिकाऱ्यांना जनसंपर्क करावा लागतो, नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडवताना मागील तीन वर्षात मधुकर बच्चे यांनी जनसंवाद सभा, लोकशाही दिन, प्रशासकीय स्तरावर ताळमेळ साधून विविध समस्यांचे निवारण केले आहे. pcmc news
संस्थेसाठी अशा प्रकारे एक समन्वयक दुवा म्हणून मधुकर बच्चे यांनी खूप मदत केलेली आहे, त्याच बरोबर गरजू महिलांचा अडचणी सोडवताना करताना त्यांची मोलाची मदत झालेली आहे.
विशेषतः आदिवासी भागात संस्थेच्या माध्यमातून काम करताना संस्थेला त्यांनी वेळोवेळी शालेय साहित्य, अन्नधान्य, औषधे, सॅनिटरी नॅपकिन्स (pads) व्हिटॅमिन गोळ्या, कपडालत्ता आदी मदत निरपेक्ष वृत्तीने दिली आहे.
त्यांच्या एकूण योगदानामुळे वुई ‘टुगेदर फाऊंडेशन’ च्या कार्यकारिणीने मधुकर बच्चे यांना सल्लागार मंडळात घेण्याचा निर्णय एका बैठकीत (दि.१४ एप्रिल) घेतला आहे.

अर्थात श्री.मधुकर बच्चे यांची वुई टुगेदर फाऊंडेशन या संस्थेच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक क्रांतीकुमार कडुलकर, अध्यक्ष सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, उपाध्यक्ष दिलीप पेटकर, शंकर कुलकर्णी, झाकीर सय्यद, सदाशिव गुरव, अनिल शिंदे, रविंद्र काळे, धनंजय मांडके, श्रीनिवास जोशी, उल्हास दाते, शैलजा कडुलकर, सोनाली शिंदे, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत मधुकर बच्चे यांना पत्र देऊन नियुक्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. pcmc news
वुई टूगेदर फाउंडेशन संस्थेच्या मागील एक वर्षाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती सचिव जयंत कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.


हे ही वाचा :
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला
ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !
…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र
मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार