Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : बो-हाडेवाडी (moshi) येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई

PCMC : बो-हाडेवाडी (moshi) येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने क क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.२ बो-हाडेवाडी येथील गट क्र.२३३ व २३४ इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील सुमारे १८ हजार चौरस फूटाची अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई आज करण्यात आली. PCMC Action On Unauthorized Construction

दोन पोकलेन आणि तीन जेसीबी यांच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत नऊ दोन मजली बांधकामे,दोन तळमजल्यापर्यतची बांधकामे, दोन जोत्यापर्यतची बांधकामे अशी एकुण १२ हजार चौरस फूटाची आर.सी.सी. बांधकामे आणि चार पत्राशेडची एकूण ६ हजार चौरस फुट अशा १८ हजार चौरस फूटांचे अतिक्रमण निष्कासीत करण्यात आले. (pcmc)

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील तसेच शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आजच्या अतिक्रमण कारवाईत उप आयुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, उप अभियंता सूर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, किरण सगर, बीट निरीक्षक श्रीकांत फाळके त्याचप्रमाणे भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे गणेश जामदार, किरण पठारे, ३० पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २२ सुरक्षा रक्षक,अतिक्रमण आणि अग्निशामक पथकाचे जवान, वैद्यकीय विभागातील रूग्णवाहिकेचा समावेश होता. PCMC

परवानगी घेऊन बांधकामे करा

शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यापुढेही चालू राहणार असून शहरातील नागरिकांनी रितसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, अनधिकृत बांधकामे करू नयेत असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या !

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय