Tuesday, May 14, 2024
Homeराज्यशासनाचे नियम डावलून हॉस्पिटलमध्ये महागड्या बिलांद्वारे रुग्णांची होतोय लूट; शासनाच्या बोटचेपी भूमिका,...

शासनाचे नियम डावलून हॉस्पिटलमध्ये महागड्या बिलांद्वारे रुग्णांची होतोय लूट; शासनाच्या बोटचेपी भूमिका, आपचा आरोप.

नागपूर : कोविड काळात खाजगी हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाचे नियम डावलून महागड्या बिलांद्वारे रुग्णांची होणारी लूट व शासनाच्या बोटचेपी भूमिका तसेच आरोग्य विभागातील रिक्तपदे, अपुरे बजेट, अपुऱ्या सुविधा याविरोधात आम आदमी पार्टीनेे राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी पुढील एक वर्षासाठी सुरु रहावी, त्यातील खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

याबाबत सरकारने कारवाई केली नाही तर नाईलाजास्तव जनतेला त्यांच्या आरोग्यसेवांसाठी रस्त्यावर उतरून त्यांचा आक्रोश प्रकट करावा लागेल, असा इशारा आम आदमी पार्टी दिला आहोत. यावेळी आपचे राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संयोजक श्रीमती कविता सिंघल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, जय शिंदे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय