Monday, May 13, 2024
Homeराजकारणकामगार कायद्यातील बदलांविरोधात आयटकचे आज राज्यव्यापी आंदोलन.

कामगार कायद्यातील बदलांविरोधात आयटकचे आज राज्यव्यापी आंदोलन.


नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना पार्श्वभूमीवर लोकडाऊन जवळ जवळ तीन महिने कामगाराच्या हाताला काम नाही.त्यामुळे  हातात पैसे नाहीत.राहत्या घरातून घर मालक बाहेर काढत आहेत.बाहेरचे कामगार मिळेल त्या वाटेने घर गाठले. पॅकेज जाहीर केले परंतु कामगारांच्या वाटयाला काहीच नाही असे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

     यामध्ये कामगारांच्या हिताचे कायद्यात बदल घडवून आणलेला दिसून येतो. मालकाचा कामगारांवर कसा दबाव राहील असे कायदे केलेलले दिसून येतात. सत्ता ही मालकाच्या हातात दिसून येते. कुठेतरी मानव अधिकाराचा गैरवापर होताना दिसत आहे.मालकाच्या बाजूने कायदे तयार करून कामगाराला गुलामगिरीत ढकलत असाल तर कामगार संघटना खपवून घेणार नाही.

    या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्यभर निषेध करणार आहेत.

मागण्या खालील प्रमाणे :

● संकटात सापडलेल्या सर्व कामगारांना अन्न मिळेल याची हमी द्या.

● लॉकडाऊन च्या काळात कामगाराचा पगार कपात बंद करा.

● सर्व असंघटित कामगारांना दरमहा किमान ७५०० रुपये जमा करा.

● लॉकडाऊन च्या काळात केलेल्या कामाचा मोबदला द्या.(आशा,अंगणवाडी,आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी)

● वीज बिल माफ करा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय