Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Parbhani: जातीय सलोख्यासाठी भाकपला मतदान करा – कॉम्रेड राजू देसले

Parbhani : देशात ज्या ज्या वेळी कष्टकरी अल्पसंख्यांक जनतेवर भाजप सरकारने दडपशाही मनमानी अन्याय अत्याचार करते, त्यावेळी त्यांचे सोबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष लढतो हा सार्वत्रिक अनुभव परभणीच्या (Parbhani) जनतेला आहे. दुसरीकडे ६००/७०० किलोमीटर अंतरावरील नेते यांना केवळ जातीची मते जास्त आहेत म्हणून त्याच निकषावर महायुतीने परभणी मतदारसंघाची उमेदवारी देणे हा मतदारांचा अपमान आहे. ते महाआघाडी चे उमेदवार सत्तेसाठी मांडवली करणार नाहीत त्याची गॅरंटी कोण देणार? त्यासाठी आपल्या मतदार संघातून ऊस कामगार, किसान, माथाडी कामगार यांचे नेते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ उमेदवार कॉ. राजन शिर्सागर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. राजू देसले यांनी रहीम नगर येथे आयोजित प्रचार सभेत केले.

---Advertisement---

सभेच्या अध्यक्षस्थानी कॉ. मेहबूब शेख होते. सभेचे दुसरे वक्ते मराठवाड्याचे शेतमजूर संघटनेचे नेते प्रा.राम बाहेती म्हणाले की, सीएए, एनआरसी लादून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी यांना त्रास देणे शिवाय दुसरे उद्दिष्ट काय?. विचारणा करून म्हणाले की, महागाई बेरोजगारी महिला अत्याचार या प्रश्नांना बगल देऊन मोदी सरकार जनतेला आणखी छळत आहे, म्हणून ते बदलणे गरजेचे आहे.

या सभेत माजी नगरसेवक बशीर भाई म्हणाले की, कारवाईचे शस्त्र ज्या वेळेवर मुस्लिम तरुणांवर उभारले तसेच इस्रायलचे मुस्लिमान वरील अत्याचार झाले. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व राजन क्षीरसागरच धावून आले. असा कृतज्ञपूर्वक उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. (Parbhani)

---Advertisement---

परभणी मतदार संघाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी आपल्या दहा-बारा मिनिटांच्या भाषणात मोदी सरकारने रन अँड हिट कायद्यात ड्रायव्हर लोकांना भरडण्याचा प्रयत्न केला तसेच संविधानाचे संकेत जाणून मनमानी तीन कायदे केलेत ते म्हणजे संविधानाला तिलांजली देण्याच्या प्रकारच होय. सांगून भारतीय संविधान जातीय सलोखा कष्टकरी जनतेचा आवाज उठवण्यासाठी माझी उमेदवारी आहे तरी मतदाराने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या सभेचे सूत्रसंचलन कॉ.अब्दुल शेख यांनी केले. (Parbhani)

राजन क्षीरसागर यांच्यासाठी भाकपची फळी मैदानात

राजन क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी भाकपचे राज्य सचिव सुभाष लांडे यांचे नेतृत्वात माजी सचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष हिरालाल परदेशी, नामदेव चव्हाण, जळगाव चे शेतमजूर नेते कॉम्रेड अमृत महाजन, औरंगाबादचे माजी नगरसेवक कॉम्रेड अशपाक सलामी, नाशिकचे भास्कर शिंदे द्वारका एम्बडवार वर्धा, मुंबईचे प्रकाश बागवे, सूर्यकांत देसाई, लाल बावटा कला पथकाचे रवी देवांग, शाहीर अमीर शेख, प्राजक्ता कापडणे, सोनाली थवकर, तलहा शेख आदी राज्यभरातील नेते मैदानात उतरली असून खेडोपाडी प्रचार करीत मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

---Advertisement---

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles