Tuesday, May 7, 2024
Homeग्रामीणपरभणी : रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी पूर्णा येथे "डीवायएफआय"चे आंदोलन

परभणी : रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी पूर्णा येथे “डीवायएफआय”चे आंदोलन

पूर्णा : कोरोनाचा संसर्ग आता निवळत आला आहे आणि मानवी जीवन पूर्वरत होत आहे. जवळपास सर्व दळवळणाची सर्वच साधने सुरू झाली आहेत, पण गरीब लोकांच्या हिताची व त्यांच्या दळवळणासाठी परवडणारं मुख्य साधन म्हणजे रेल्वे पॅसेंजर गाडी आहे, तेच सध्या पूर्णपणे बंद आहे. 

ही रेल्वे बंद असल्यामुळे दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे, तसेच मजुरांचे व छोट्या व्यापाऱ्यांचे सुद्धा मोठा प्रमाणात हाल होत आहेत. या समस्या लक्षात घेऊन पूर्णेतील डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या संघटनेच्या तरुणांनी रेल्वे पॅसेंजर गाड्या नियमित सुरू करा, दररोज बाहेरगावी ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, कामगार व इतर सर्व घटकांना महिन्याच्या पासेस द्या, तिकीट काउंटर पूर्वीप्रमाणे चालू करून जनरल तिकीट द्या, रेल्वेचं खाजगीकरण थांबवा, इत्यादी मागण्यांना घेऊन रेल्वे स्टेशन पूर्णा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, अजय खंदारे, तुषार मोगले, पांडुरंग दुथडे, गंगाधर लोंढे, प्रबुद्ध काळे, जय एंगडे, धीरज अहिरे, हर्षल अहिरे, जाकेर शेख, अकबर भाई, जहिर, आरिफ भाई, कुणाल सोनवणे, अरविंद पवार, सुबोध खंदारे, सलिम शेख, राहुल पुंडगे, विशाल खंदारे, संजय हाटकर,सचिन अहिरे, राज ठाकर यांसह इतर १००/१३५ कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, AIMIM पक्षाचे शफिक शेख, ऑल इंडिया ख्रिश्चन महासंघाचे सॅमसन कांबळे, मलखांब प्रशिक्षक गौतम मुळे, योगेंद्र गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगितलं. 

यानंतर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन या संघटनेच्या युवकांनी रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू करा, आणि इतर सर्व मागण्यांचे निवेदन स्टेशन मास्टर पूर्णा यांच्या माध्यमातून रेल्वे जनरल मॅनेजर दक्षिण मध्य रेल्वे व रेल्वे मंत्रालय दिल्ली तसेच पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती आदींना पाठवण्यात आले. जर येत्या दहा दिवसात या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने दिला आला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय