Sunday, May 12, 2024
Homeग्रामीणपंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करावी; लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची मागणी.

पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करावी; लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची मागणी.

कागल (प्रतिनिधी) : पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करून पंचगंगा नदी तीरावरील इचलकरंजीसह सर्वच गावांना शुद्ध व मुबलक पाणी पंचगगेतूनच द्यावे अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या कागल तालुका कमिटीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

निवेदनात पुढे म्हटले आहे, पंचगंगा नदीवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबित असलेल्या इचलकरंजीसह अन्य गावांसाठी प्रदूषित, दुर्गंधी युक्त पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतीरावरील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचगंगा नदी प्रदुषित करणाऱ्या कंपन्या व प्रदूषित करण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व घटकांवर तातडीने कारवाई करावी. 

प्रदुषण नियंत्रण मंडळाने निर्भिडपणे प्रदुषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी व पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करून पंचगंगा नदीतीरावरील इचलकरंजीसह सर्वच गावांना शुद्ध व मुबलक पाणी दूधगंगा नदीतून न देता पंचगगेतुनच द्यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम, विक्रम खतकर, मोहन गिरी, राजाराम आरडे, जोतिराम मोंगणे, विजय साटपे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय