Pune : आष्टी, पाटोदा, शिरूर या भागातील पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांसाठी कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष मेळावा महाराष्ट्राचे महसूल राज्य मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी, रविवार, सकाळी 10 वाजता, द्रौपदा लॉन्स, कस्तुरी चौक, हिंजवडी-डांगे चौक रोड, वाकड येथे होणार आहे.
या मेळाव्यात आष्टी, पाटोदा, शिरूर येथील पुण्यात वास्तव्यास असलेले युवा, व्यवसायिक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला उपस्थित रहाण्याचे आहवान युवा उद्योजक बंडू तोडकर आणि युवा नेते शहादेव चौधरी यांच्या वतीने करण्यात आला आहे. (Pune)
मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा होणार असून, उपस्थितांना राज्याचे महसूल राज्य मंत्री सुरेश धस हे मार्गदर्शन करणार आहे.
हेही वाचा :
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती