Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाजाचक कामगार कायद्याच्या विरुद्ध लढणार, असंघटित कामगारांसाठी मुंबईत एक दिवसीय बैठक

जाचक कामगार कायद्याच्या विरुद्ध लढणार, असंघटित कामगारांसाठी मुंबईत एक दिवसीय बैठक

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले कामगार कायदे जाचक व अन्यायकारक असुन कामगार संपूष्ठात येणार आहे, या कामगार कायद्याच्या विरोधामध्ये लढा उभारण्याचा निर्णय आज मुंबईत घेण्यात आला. वर्किंग पीपल्स चार्टर  तर्फे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे एक दिवस चिंतन बैठक मुंबई सेंट्रल येथे झाली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, उल्का महाजन, ऍड गायत्री सिंग, ऍड मीना मेनन, राजु भिसे, राजु वंजारे, कामगार नेते काशिनाथ नखाते, बिलाल खान, विनोद शेट्टी आदी उपस्थित होते.

चंदन कुमार म्हणाले, देशभरातील कामगारांची सध्याची अवस्था बिकट असून सध्याच्या स्थितीमध्ये कामगार कायद्याचा आधार राहिलेला नाही आणि जे कायदे आपण लढाईतून मिळवलेले आहेत ते रद्द केल्यामुळे इथून पुढे कामगार हक्कासाठी कोणाकडे जायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. रस्त्यावरील लढाई बरोबरच कायदेशीर लढाई सुद्धा याविरोधात लढावी लागणार आहे. काशिनाथ नखाते म्हणाले की, समाजिक सुरक्षा अत्यंत महत्वाची असुन ती त्यांना मिळावी, कष्टकऱ्यांसाठी असलेल्या लाभासाठी विविध त्रुटी असल्याने शासकीय योजनांमधून त्यांना लाभ मिळत नाही तसेच त्यांची नोंदणी जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे तरच ते लाभार्थी ठरतील असे ते म्हणाले. यावेळी प्रस्ताविक बिलाल खान यांनी तर आभार विनोद कदम यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय