Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनासावधान ! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा

सावधान ! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा

नवी दिल्ली / रफिक शेख : केरळमध्ये ज्या प्रकारे ओणमनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ नोंदवली गेली, तसाच प्रकार महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

हे वाचा ! मराठी विद्यार्थ्यांनी युरोप अमेरिकेत केला गणेशउत्सव साजरा

लोक गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यामुळे ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. सण आणि कोरोना देशातील अनेक राज्यात सार्वजनिक उत्सवांनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं यापूर्वीही दिसून आलं आहे. नुकतंच केरळमध्ये ओणमनंतर रुग्णसंख्या वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं.

हे पहा ! घोडेगाव : वाचन चळवळ हीच समाजपरिवर्तनाची नांदी

महाराष्ट्रातही सध्या गणेशोत्सव साजरा होत असून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचं चित्र आहे. बहुतांश नागरिका सध्या मास्क वापरत नसल्याचं चित्र दिसत असून त्यामुळे कोरोना वेगाने फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवात काळजी घेण्याचं आवाहन गणेशोत्सवाच्या काळात जर कोरोना संकेतांचं नीट पालन केलं, तर मात्र कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्यापासून रोखली जाऊ शकते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

हे वाचा ! मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा – एसएफआय

गणेश मंडळांनी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशनची काळजी घेणं, मास्कशिवाय प्रवेश न देणं ही खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाची केंद्रं वाढवणं आणि त्याचबरोबर टेस्ट आणि औषध पुरवठा यांची सोय करणं गरजेचं असल्याचा सल्लाही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

जाचक कामगार कायद्याच्या विरुद्ध लढणार, असंघटित कामगारांसाठी मुंबईत एक दिवसीय बैठक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय