Wednesday, July 3, 2024
Homeताज्या बातम्याMajhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले...

Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई, दि. १ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. उद्यापासून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास सचिव डॉ. अनुप कुमार यादव उपस्थित होते. तर दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वयाने आणि जलदगतीने काम करण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांच्या कुटुंबातील भूमिका मजबूत करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा

लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे. यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावेत. ज्या पात्र महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. (Majhi Ladki Bahin Yojana)

आवश्यक दाखल्यांची पूर्तता

सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. गावपातळीवर विशेष शिबीरांचे आयोजन करणे आवश्यक असल्यास ते करावेत. तसेच, जिल्हापातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समन्वय आवश्यक

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि जलदगतीने काम करावे, अशी सूचना मंत्री तटकरे यांनी दिली आहे. महिलांच्या कल्याणासाठी सरकारने केलेली ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित होण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय