Sunday, May 19, 2024
HomeNewsसंविधान दिनानिमित्त घोडेगावात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व मुक्तचर्चा

संविधान दिनानिमित्त घोडेगावात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व मुक्तचर्चा

SFI, किसान सभा व आदिम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

आंबेगाव
: आज दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी घोडेगाव येथे संविधान दिनानिमित्त SFI, किसान सभा व आदिम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच संविधानाच्या विविध मूल्यांवर मुक्त चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SFI पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, प्रमुख उपस्थिती म्हणून आदिवासी ठाकर विकास संघर्ष समितीचे अर्जुन काळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमातील संविधानाच्या मुल्यांवरील मुक्त चर्चेत उपस्थित सर्वच विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

याच कार्यक्रमात जुन्नर येथे नुकत्याच पार पडलेल्या SFI महाराष्ट्र राज्य अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या अमोल धादवड, निखिल धुमाळ, आदित्य डामसे, तुषार बांबळे, अपेक्षा बांबळे, फोटोग्राफर राहुल कारंडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन किसान सभेचे कार्याध्यक्ष बाळू काठे यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिम संस्थेचे अनिल सुपे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन SFI सहसचिव योगेश हिले यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन SFI आंबेगाव तालुका समितीचे सहसचिव योगेश हिले, कोषाध्यक्ष रोहिदास फलके, आदिम संस्थेचे अनिल सुपे, किसान सभेचे बाळु काठे यांनी केले होते.

Lic
Lic
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय