Monday, May 6, 2024
HomeNewsअनंत चतुर्दशी निमित्त गणरायाचे होणार पर्यावरणपूरक विसर्जन !

अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाचे होणार पर्यावरणपूरक विसर्जन !

पुणे – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मानाच्या गणपतींसह प्रमुख दोन गणपतींचे महापालिकेकडून नदीपात्रात उभारण्यात आलेल्या विशेष हौदांमध्ये विसर्जन केले जाते.
यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.

शहरातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, या उद्देशाने महापालिकेकडून काही वर्षांपूर्वी मानाच्या सर्व गणपतींना साकडे घालत हौदात विसर्जसन करण्याची विनंती केली होती. त्यानंतरही परंपरा अद्यापही सुरू आहे.

या विसर्जनासाठी महापालिकेकडून मुठा नदीकाठावर पांचाळेश्‍वर आणि पंतगा घाट येथे विशेष सुविधा उभारल्या आहेत. तर मानाच्या गणपतींकडून हौदातच विसर्जन करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने शहरातील इतर गणेश मंडळे तसेच नागरिकांकडूनही पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय