Saturday, May 18, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र हादरला : मेंढ्या वळण्यासाठी आदिवासी चिमुकल्यांची ३ ते ५ हजारात खरेदी-विक्री,...

महाराष्ट्र हादरला : मेंढ्या वळण्यासाठी आदिवासी चिमुकल्यांची ३ ते ५ हजारात खरेदी-विक्री, ३० मुलांची विक्री झाल्याचे समोर

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेंढ्या वळण्यासाठी आदिवासी चिमुकल्याची ३ ते ५ हजारात खरेदी-विक्री करण्यात आली आहे. या आदिवासी बालकांची किंमत म्हणून त्यांच्या पालकांना एक मेंढी आणि ३ ते ५ हजार रुपयांची रक्कम देऊन हा सौदा पुर्ण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गौरी आगिवले या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर हे प्रकरण उघकीस आले आहे. तुळसाबाई सुरेश आगिवले यांनी तीन वर्षांपूर्वी मुलगी गौरी (१०) हिला विकास सीताराम कुदनर (शिंदोडी, ता. संगमनेर) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर त्यांनी गौरीला प्रचंड मारहाण केली. २७ ऑगस्टला मध्यरात्री गौरीला उभाडे येथील तिच्या झोपडीजवळ टाकून पलायन केले. सात दिवसांच्या उपचारानंतर गौरीचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर श्रमजीवी संघटनेने वाड्या-वस्त्यांवर केलेल्या पाहणीत अशा ३० मुलांची विक्री झाल्याचे उघडकीस आले.

आदिवासी समाजातील मागासलेपण, अशिक्षितपणा, दारिद्र्य याचा फायदा घेऊन काही भामट्यांकडून या चिमुकल्यांची खरेदी केली जाते. आदिवासी समाजातील ही बालके ६ ते १५ वयोगटातील असतात. आतापर्यंत अशा ३० मुलांची विक्री झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यातील ६ मुले सापडली असून २४ मुले बेपत्ता आहेत. श्रमजीवी संघटनेने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या संदर्भातील वृत साम या वृत्तवाहिनीने दिले आहे.

आदिवासी बालकांची खरेदी विक्री करणारे हे रॅकेट नाशिक, अकोला, अहमदनगर या जिल्ह्यांत पसरले असल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी घोटी (जि. नाशिक), अकोले आणि घुलेवाडी (जि. अहमदनगर) या तीन पोलिस स्टेशनमध्ये वेठबिगारी, बालमजुरी आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय