Saturday, May 4, 2024
HomeNewsकिगा आईस्क्रीम तर्फे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला मोतीचूर बुंदीचा आईस्क्रीम...

किगा आईस्क्रीम तर्फे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला मोतीचूर बुंदीचा आईस्क्रीम नैवेद्य अर्पण !

पुणे : पुण्यातील आईस्क्रीम बनवणाऱ्या एका व्यापाऱ्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला मोतीचूर बुंदीचा 130 किलोचा आईस्क्रीम नैवेद्य अर्पण केला आहे.

शहरातील प्रसिद्ध किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे आणि गणेश गोसावी या व्यापाऱ्यांनी मंडळाच्या 130व्या वर्षानिमित्त 130 किलो वजनाचा मोतीचूर लाडू मिश्रित आईस्क्रीमचा नैवेद्य गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केला. 5 ते 6 दिवसाच्या परिश्रमाने हा आईस्क्रीमचा लाडू बनविण्यात आला. गणपतीला अर्पण केल्यानंतर तो भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला. हा अनोखा प्रसाद घेण्यासाठी गणेशभक्तांचीही झुंबड उडाली होती. प्रसाद आईस्क्रीमचा असल्यामुळे तो लवकर संपवणेही आवश्यक असल्याने भाविकांना तो वाटण्यात आला.



किरण साळुंखे म्हणाले, की श्रीमंत दगडूशेठ गणपतीला यंदा 130 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कारणाने आम्ही खास 130 किलोचा आईस्क्रीम मोतीचूर लाडू बनवला आहे. यासाठी जवळपास आम्हाला पाच ते सहा दिवस लागले. दरवर्षी दगडूशेठ गणपतीसाठी आमचा काही ना काहीतरी संकल्प असतो. मात्र मागील दोन वर्ष कोरोनामुळे अनेक बंधने होती. यंदा मात्र आम्ही गणपती बाप्पासाठी खास हा मोतीचूर लाडू आणि आईस्क्रीम अर्पण केले आहे, असे किरण साळुंखे म्हणाले. किरण साळुंखे आणि गणेश गोसावी यांच्या किगा आईस्क्रीमतर्फे हा अनोखा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला.यावेळी बारामती किगा आईस्क्रीम चे प्रशांत गोसावी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय