Wednesday, April 24, 2024
HomeNewsमहाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन ; हे होणार नवे महाराज !

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन ; हे होणार नवे महाराज !

लंडन : ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके विराजमान असलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रिन्स चार्ल्स हे नवे राजे म्हणून काम करतील.

वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थामुळे एलिझाबेथ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. त्या मोजक्याच कार्यक्रमात उपस्थित राहत. वयोमानामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवरही बंधने आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावत गेली होती.

बकिंगहॅम पॅलेसने निवेदनात म्हटले आहे की, आज दुपारी बाल्मोरलमध्ये महाराणीचे निधन झाले. किंग व क्वीन कंसोर्ट आज रात्री बाल्मोरलमध्ये राहतील. ते उद्या लंडनमध्ये परततील. महाराणीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे राजघराण्यातील सदस्य येथे दाखल झाले होते. मृत्यूच्यावेळी त्यांच्या कन्या प्रिन्सेस ॲने त्यांच्याजवळ होत्या. वृद्धापकाळाशी संबंधित त्यांना आजार होते. १९५२ मध्ये राणीचा राज्याभिषेक झाला होता व त्यांनी अनेक सामाजिक बदल केले. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या देशाला कायम प्रेरणा दिलेली आहे. त्यांचे नेतृत्व कधीही न विसरता येणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यासह जगभरातील अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सोर्स : लोकमत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय